दारात भारताच्या गर्दी अलोट आहे

आदेश हा किताबी संदेश आसमानी
दारात भारताच्या गर्दी अलोट आहे

शतके सहिष्णुता ही पोसून सोसली मी
अब्रू जमीन सारी गमवून आज आहे

एका अलिबाबाचे झाले चव्वे-चाळीस
प्रत्येक चोर पुन्हा राहतो गर्भार आहे

डाव्यांस खाज आज सुटली साम्यवादी
मोजून दाम घेतो विकत पत्रकार आहे

यात्रेस जावयाला भरतो आजही जिझिया
पाहुण्यांस आज माझ्या मी देतो भाडे आहे

आश्रयास कुणी अतिथी म्हणूनि आला
घर, भूमी, आणि कन्या मागून आज आहे

जन्मास शिवाजी ते यावे पण शेजारी
वृत्तीच आत्मघाती ठरणार आज आहे

उत्तिष्ठ आज कृष्ण म्हणतो उच्चारवाने
हाती खडग घेता तरणार पार्थ आहे

तस्मात सज्ज सारे देशरक्षणास व्हा रे
अन्यथा आज सारे होणार भस्म आहे

© मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. १, शके १९३९

तळटीपः मित्र श्री कौतुक शिरोडकर यांच्या दोन ओळींवरुन सुचलेली कविता. कविता माझी असली तरी प्रेरणास्थानाचा उल्लेख अपरिहार्य आहे.

Advertisements

गावांतील देवळांचे महत्त्व

प्रत्येक गावात एक तरी प्रमुख देऊळ असावं आणि त्यातल्या देवतेचा एक तरी मोठा उत्सव असावा. आणि जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी दरवर्षी उत्सवाला हजेरी लावणारे ग्रामस्थ असावेत. नाही, हे निव्वळ स्वप्नरंजन नव्हे. ज्या गावांत असं एखादं तरी प्रमुख देऊळ असतं आणि त्याचा असा उत्सव असतो त्या गावाला शहरांकडे वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतरानंतरही तग धरुन राहणे सोपे जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक देवतेच्या वास्तव्यामुळे, तिच्या होणाऱ्या पूजाअर्चनेमुळे, एकत्र जमण्यामुळे लोकांची गावाशी नाळ जोडलेली राहते. म्हणूनच ग्रामीण भागात मंदिरे ही आजही लोकांना एकमेकांशी व स्थानिक संस्कृतीशी, आपल्या मातीशी (our roots) जोडून राहण्याची प्रेरणा देतात. भारतात काही ठिकाणी तर शैक्षणिक व खेळात जिंकलेली पदके व चषक मंदिरात ठेवलेले दिसून येतात. कारण उत्तुंग यश मिळवल्यावर ते ग्रामदेवतेच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी जपली गेलेली आहे.

ग्रामदेवता या जन्ममृत्यू, पूर, दुष्काळ, शेतीतले अपयश, एखादी दुर्घटना इत्यादी स्थानिक समस्यांबाबत ग्रामस्थांची काळजी घेणार्‍या एका प्रकारे हिंदू देवतांच्या स्थानिक प्रतिनिधी असतात. माणसाने एक वेळ चारधाम यात्रा आयुष्यातून एकदाच करावी पण आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला वर्षातून एकदा तरी जावेच. अशा प्रकारच्या स्थानिक देवता या शहरात अभावानेच आढळून येतात. म्हणूनच अर्थार्जन इत्यादी कारणांसाठी आपल्या गावातून स्थलांतरित झालेल्यांनी, शक्य झाल्यास सहकुटुंब, वर्षातून किमान एकदा तरी गावी जाऊन आपल्या ग्रामदेवेतेची पूजा करावी व उत्सवाला हजेरी लावावी. गावातली मंदिरे ही साधी असली तरी त्यांचा प्रभाव थोर असतो हे वैय्यक्तिक अनुभूतीवरुन सांगू शकतो. वर्षातून एकदा जरी गावी गेलं तरी आपल्याला तिथल्या समस्या कळू शकतात. हा उद्देशही मनात असू द्यावा व दरवर्षी आपली उपस्थिती नोंदवून यथाशक्ति यथामति आपली सेवा देवतेच्या चरणी रुजू करावी व तिथल्या परंपरा जपण्यास मदत करावी.

असं म्हणतात की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर लवकरच श्री अजित डोबाल यांनी आपल्या जवळ जवळ ओस पडलेल्या गावी जाऊन आपल्या ग्रामदेवतेचे दर्शन व आशीर्वाद घेतले होते. आता इतका व्यग्र माणूस हे करु शकतो, तर आपण का नाही? इच्छा ठेवा, मार्ग दिसेलच.

© मंदार दिलीप जोशी

चुळचुळ मुंगळा, एकसुरीपणा, एकाग्रता आणि मन:स्वास्थ्य

[काही दिवसांपूर्वी आनंद राजाध्यक्ष यांनी हिंदीत एक लेख टाकला होता. मोनोटोनी किंवा एकसुरीपणा याबद्दल ती पोस्ट होती. ती टाकली असती तर लगेच मराठीत पण लिही अशी मागणी झाली असती म्हणून मराठी करुन टाकतो आहे. ती पोस्ट आज आठवण्याचे कारण म्हणजे वैद्य परीक्षित शेवडे यांनी आज एका फिजेट स्पिनर नामक खेळण्यावर लिहीलेली पोस्ट. या दोन्ही लेखांतला संबंध लक्षात आला आणि डोक्यात असंख्य दिवे पेटले. दोन्ही लेखांची सांगड घालून लिहीण्याचा हा प्रयत्न आहे. या लेखाचे श्रेय संपूर्णपणे वरील दोघांना आहे. माझं श्रेय असेल तर सूर्याचा प्रकाश पृथ्वीकडे परावर्तित करणार्‍या चंद्राला जातं तेवढंच.]लहानपणी सतत अस्वस्थ असणार्‍या आणि अंगात प्रचंड उर्जा असणार्‍या उपद्व्यापी मुलांसाठी, अर्थात त्यात अस्मादिकही होते, चुळचुळ मुंगळा हा एक मजेशीर शब्दप्रयोग केला जायचा. लहान मुलांना कुठलेही काम सतत करायला किंवा करत राहायला आवडत नाही. कारण लहान मुलांचा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा वेळ हा मुळातच कमी असतो. त्यामुळे थोड्या मोठ्या काळासाठी जिथे लक्ष केंद्रित करावं लागतं अशा गोष्टी मुलांना करायला आवडत नाहीत. अशी कामं मुलांना फार लवकर एकसुरी म्हणजे ज्याला इंग्रजीत मोनोटोनस म्हणतात तशी वाटू लागतात. मुले संपूर्ण सिनेमा बघत नाहीत, पण अ‍ॅनिमेशन किंवा आपण ज्याला कार्टून म्हणतो ते मात्र मुलं अगदी आवडीने बघतात. याचं कारण तिथे सेकंदाच्या शंभराव्या भागातही सतत वेगाने पात्रे हालचाल करत असतात असं वैविध्य असतं.

कालांतराने हीच मुलं मोठी होऊन नोकरीला लागल्यावर मात्र मल्टीटास्किंग नावाचं भूत त्यांच्या मानगुटीवर बसवण्यात आलं. कारण एकच काम सतत करण्याचा संयम वय वाढल्यावर आला खरा, पण अनेक दिवस किंवा अनेक महिने तेच काम केल्याने कंटाळाही येऊ लागला. किंवा तो कंटाळा तुम्हाला येतो आहे असं सातत्यने मनावर बिंबवलं जाऊ लागलं. समस्येच्या समाधानावर लक्ष केंद्रित न करता सातत्याने समस्येच्या शोधात असलेल्या वामपंथी लोकांसाठी हे मोठं चराऊ कुरण होतं. कायम ताजातवाना दिसणार्‍या माणसाला “तुला बरं नाहीये का?” असं तीन-चार लोकांनी विचारलं की जसं खरंच “आपल्याला थकल्यासारखं वाटतंय” असं वाटू लागतं तसंच एकच काम सातत्याने करणं हे फार कंटाळ्याचं काम आहे बुवा, सतत बदल हवा असं लोकांवर, विशेषतः कॉर्पोरेट मनावर ठसवण्यात येऊ लागलं. एकाग्र होऊन प्रत्येक काम वेगाने हातावेगळं करण्याऐवजी एकाच वेळी अनेक कामांना हात घालणं हा मोठा गुण मानला जाऊ लागला. अर्थात आपल्याकडे चतुरावधानी, अष्टावधानी, आणि अगदी शतावधानी असणं हे पूर्वी शिकवलं जायचंच. मात्र त्यातही पहिला भर एकाग्रतेवर असायचा. हाच भर विसरल्याने आता मल्टीटास्किंगमधे एक ना धड भाराभर चिंध्या हा प्रकार बघायला मिळतो. आपण एकाग्रतेच्या पारंपारिक पद्धती वतंत्र सोडून दिल्या आणि मल्टीटास्किंग हे कौशल्य शिकवायला कन्सल्टन्ट नामक तज्ञ लोकांना भरमसाठ पैसे देऊन आपल्या उरावर बसवलं. एकाग्रतेची नकारात्मक बाजूच आपल्याला शिकवली गेल्याने आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट विसरलो आणि ती म्हणजे चित्त एकाग्र केल्याने आपण आपल्या आवडीच्या विषयाच्या किंवा कामाच्या बाबतीत प्राविण्य (mastery) मिळवू शकतो ही. 

पिठाच्या गिरणीत कधी गेला असाल तर तिथल्या भैय्याचं निरीक्षण करा. हातात एक लोखंडी उपकरणाचा भाग घेऊन तो एका विशिष्ट लयीत गिरणीच्या यंत्राला ठोकत फिरवताना तुम्हाला आढळेल. एकसुरीपणाची मजा घेत एकसुरीपणावर त्याने त्याच्याही नकळत केलेली ही मात असते. हे एक अत्यंत लहान उदाहरण झालं. कौशल्य लागणारे असे अनेक व्यवसाय आहेत की ज्यात एकच काम हजारदाही करावं लागतं. पण तेच काम पुन्हा पुन्हा आवडीने, त्या कामाची मजा घेत केलं तरच हे काम आपल्याकडून होऊ शकतं. यातून लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट अशी की enjoying monotony is the key to acquiring mastery. एखाद्या कामात प्राविण्य मिळवण्याचा मार्ग हा त्या कामाचाएकसुरीपणाचा आनंद घेत करण्यातूनच जातो. ते करण्याच्या आधीच मल्टीटास्किंगच्या जंगलातून जाण्याचा प्रयत्न केलात तर मात्र चित्त विचलित होऊन प्राविण्य मिळवणं ही फार लांबची गोष्ट ठरते. एकच काम न कंटाळता, त्यातल्या एकसुरीपणाचा आनंद घेत केलं तरच प्राविण्य मिळवता येतं आणि त्यानंतरच चतुरावधानी, अष्टावधानी, आणि अगदीशतावधानी होण्याचाही विचार करता येतो. 

एकसुरीपणाची मजा कशी घ्यावी? एकाग्रता कशी कमवावी? याचे अनेक मार्ग आहेत. यातले दोन मार्ग आपण पाहूया. आता हा व्हिडिओ पहा. 


साधारण चौदा मिनीटांच्या या व्हिडिओत या जपानी आजी फक्त तीन बाण सोडतात. नाद्वि, मणिबंधम, बहिर्मुखम असं म्हणत एकाच वेळी तीन बाण सोडून काही वेळातच शत्रूसैनिकांच्या मृतदेहांचा खच पाडणार्‍या बाहुबलीच्या आभासी का होईना पण वेगवान युगात चौदा मिनीटात फक्त तीन बाण सोडणार्‍या या आजी खुळ्या वाटण्याचीच शक्यता आहे. मात्र प्रत्येक गोष्टीला आपल्या शैलीत बांधण्याचं, त्याचं सांस्कृतिक मार्केटिंग करण्याचं, आणि सरतेशेवटी लोकांच्या गळ्यात मारण्याचं चीनी आणि जपानी लोकांचं कसब वाखाणण्याजोगे आहे. हा व्हिडीओ बघणार्‍यांपैकी कुणाच्या डोक्यात किडा वळवळला तर कदाचित ज्या प्रमाणे अनेक पारंपारिक गोष्टींचा त्याग करुन आपण चिनी आणि जपानी गोष्टी लादून घेतल्या त्या प्रमाणे पारिंपारिक धनुर्विद्या सोडून हे फॅड सुद्धा येईल. पण तो विषय वेगळा आहे. असं जरी असलं तरी आपण त्यांच्या चांगल्या गोष्टी बघून आणि जमल्यास त्यातून शिकायला घ्यायला हरकत नाही. व्हिडिओत एकाग्रतेसाठी या जपानी आजी जे काही करतात ते बघण्यासारखं आहे. आजींकडे बघताच त्यांच्याबद्दल आदर वाटू लागतो असं व्यक्तिमत्व आहे. आधीच सांगतो, महाप्रचंड बोअरिंग व्हिडिओ आहे. आणि पुन्हा सांगतो, चौदा मिनीटांच्या या व्हिडिओत या जपानी आजी फक्त तीन बाण सोडतात. पण काही शिकायला मिळेल या भावनेतून हा व्हिडिओ बघायला गेलात तर तुम्हाला अर्थातच धनुर्विद्या येणार नाही पण बाकी बरंच काही शिकायला मिळेल. मनोनिग्रह कसा केला जातो, स्वतःला शांत आणि संयमित कसं केलं जातं, कशा त्या आजी धनुष्य उचलायच्या आधी व्यवस्थित एकाग्रचित्त होतात, मग धनुष्य उचलणं आणि बाण सोडणं हे एकाच लयीत (single fluid motion) कसं होतं, आणि शेवटी बाण सोडल्यानंतरही पुढच्या क्रिया कशा केल्या जातात आणि लक्ष्यावर तेव्हाही कसं चित्त एकाग्र कसं केलं जातं या गोष्टींचं निरीक्षण केल्याने जे शिकायला मिळतं ते इतर अनेक बाबतीत कामी येईल.

हे इतर काही व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओत काही जपानी लोकांबरोबरच परदेशी व्यक्ती सराव करत आहेत. ज्या प्रकारे जपानी धनुर्विद्या शिकवली जाते आहे, त्यातून जपानी लोकांचं मार्केटिंग आणि विक्रीकौशल्य लक्षात येतं. आपल्याकडेही हे सगळं होतं पण…असो.

https://www.youtube.com/watch?v=7bopGfiO4K0

https://www.youtube.com/watch?v=3Z4aa5gdMUc

https://www.youtube.com/watch?v=6r_V0SXiwLo

माणसाच्या गुणसूत्रात काही गोष्टी मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीकाळापासून आजपर्यंत हजर आहेत, त्यांना काळही नष्ट करु शकलेला नाही. तद्वत, राम आणि अर्जुन ही व्यक्तिमत्वे हिंदूच्या सांस्कृतिक गुणसूत्रांत अशीच कोरली गेलेली आहेत. म्हणूनच कदाचित धनुष्यबाण चालवणं हा एक पूजा करण्यासारखाच दिव्य अनुभव असतो. खुंटीवर टांगलेलं किंवा एखाद्या स्टँडवर ठेवलेलं धनुष्य उचलणं, त्यावर प्रत्यंचा चढवणं, त्या प्रत्यंचेचा टणत्कार, भात्यातला बाण उचलून तो प्रत्यंचेवर ताणणं, श्वास घेऊन स्वतःला स्थिर करणं आणि सरते शेवटी लक्ष्यभेद या क्रिया म्हणजे एक दिव्य अनुभव असतो. या क्रिया करताना मनात येणार्‍या भावनांची तूलना केवळ गणेशमूर्तीत प्राणप्रतिष्ठा करण्यापासून उत्तरपूजा करुन पार्थिव गणेशाचं विसर्जन करेपर्यंत भाविकांच्या मनात जे भाव येताच त्याच्याशीच होऊ शकेल.

पण केवळ धनुर्विद्याच शिकावी असं काही नाही. धनुर्विद्येला पर्याय म्हणून एअर रायफल शूटिंग शिकता येईल. घरच्या घरी करण्याजोगा पर्याय हवा असेल तर डार्टबोर्डचा उपयोग करता येईल. या तिन्ही प्रकारांचा उपयोग केवळ एकाग्रता वाढवणे इतकाच नव्हे तर ताणतणाव कमी करण्यात मुलांना आणि मोठ्यांना सारखाच होऊ होतो. 

हे थोडेफार शारिरिक श्रम आणि थोडाफार खर्च आवश्यक असणारे पर्याय झाले. आता बसल्या बसल्या आणि चक्क फुकट करु शकतो असे प्रकार पाहूया. मनाची चंचलता ही वातामुळे उद्भवते असं आयुर्वेद सांगतो. वात हा सतत संचारी असल्याने चुळचुळमुंगळ्याला शांत करायचं असेल तर शरीर व मनाला स्थैर्य दिलं पाहिजे. मनाला स्थिर करायचं असेल तर ध्यान, जप यांच्यासारख्या शांतपणे बसून करण्याच्या क्रियांचा लाभ उत्तम होतो. तुमचा देवावर विश्वास असो वा नसो; तुम्ही या दोन्ही गोष्टी करू शकता. याशिवाय भ्रामरी, ओंकार ध्यान किंवा आयुर्वेदातील शिरोधारा यांचाही उपयोग केला जाऊ शकतो. 

आपण त्यातल्या त्यात सोपा पर्याय म्हणून जपाचा विचार करूया. जपासाठी आसन स्थिर आणि बसताना ताठ बसणं आवश्यक आहे. म्हणून जमीनीवर एखादी चटई किंवा योगा मॅट टाकून बसा. जमीन सपाट असावी. जिथे बसाल ती जागा हवेशीर हवी पण तुमचं चित्त विचलित होण्याइतकी नको. आता हातात एक जपमाळ घ्या. एकदा नाम उच्चारलंत की एक माळेतला एक मणी पुढे सरकवा. एका श्वासात दोन वेळा नाम घेता आलं पाहीजे. असं दोन ते तीन दिवस करा. मग हळू हळू वाढवत एका श्वासात तीन आणि चार पर्यंत गेलात तरी चालेल. मोठा श्वास घेण्याचा हा सराव एखादं बासरीसारखं वाद्य वाजवताना होऊ शकेल. कंपनीत प्रेझेन्टेशन देताना किंवा कुणाशी बोलतानाही हा दमसास उपयोगी पडेल. अगदी चालण्याच्या किंवा धावण्याचा क्रियांतही याचा उपयोग होऊ शकतो. 

आता जप कसला करायचा हे तुमच्या श्रद्धेवर आहे. “जय राम श्रीराम जय जय राम”, “गण गण गणात बोते”, “रघुपती राघव राजा राम” किंवा तुमच्या आवडीनुसार काहीही निवडा. एक किंवा दोन माळा पूर्ण केल्या तरी पुरेसे आहे. तेव्हा जप करताना घाई करु नका. आपलं ध्येय चित्त एकाग्र करणे हे आहे, जास्तीत जास्त माळा पूर्ण करणे हे नव्हे. दोन माळा पूर्ण करायला तुम्हाला साधारण १५ मिनीटे लागू शकतात. 

सर्वप्रथम उच्चारांवर भर द्या, म्हणजे तुमच्या स्वतःच्या आवाजावर. मग श्वासाच्या वेगाकडे लक्ष द्या. सगळ्यात शेवटी मणी सरकवण्याकडे. सवय नसेल तर व्यवस्थित जप करता येणे या स्थितीपर्यंत यायला बराच काळ लागू शकतो. हा इन्स्टंट प्रकार अजिबात नाही. पण याच पंधरा मिनीटांचा तुम्हाला दैनंदिन व्यवहारात उपयोग होताना दिसेल. जप करताना तुम्ही तुमचाच आवाज ऐकू शकत असाल तर तुमच्या लक्षात येईल की लोकांशी बोलताना त्यांचं म्हणणं ऐकून ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येऊ लागलं आहे. तुमचा वाचनाचा वेग वाढेल आणि वाचलेलं समजेल आणि लक्षातही राहील.

आपला जप कसा चालला आहे याची चाचणी घ्यायची असेल तर दोन तीन महिन्यांनी जवळ मोबाईल ठेवायला सुरवात करा. लघुसंदेश आणि व्हॉट्सॅपच्या संदेशांचे टण् टण् टण् ध्वनी तुम्हाला विचलित करु शकत नसतील तर तुम्ही योग्य प्रगती करत आहात असे समजा. 

ताणतणाव कमी करणं आणि चित्त एकाग्र करणं या करता काही एक प्रयत्न करावे लागतात. हातात चेंडू दाबून किंवा हल्ली ऑनलाईन आणि ऑफलाईन बाजारात धुमाकूळ घालणारा fidget spinner यांचा काही एक उपयोग होत नाही. लेखात वर उल्लेख असलेल्या भंपक गोष्टींसारखीच fidget spinner ही वस्तू आहे. चिंता, ताणतणाव इतकंच नाही तर स्वमग्नता (autism), ADHD यांसारख्या मानसिक समस्यांवरही हे स्पिनर्स उपचार म्हणून काम करतात असं सर्रास कानावर पडत असलं तरी हा फक्त आणि फक्त मार्केटिंग फ़ंडा आहे. प्रत्यक्षात तसं काही होतं हे सिद्ध करणारं एकही संशोधन झालेलं नाही. किंबहुना या स्पिनर्समुळेच विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासात लागत नसल्याचं लक्षात आल्याने अमेरिका व इंग्लंडमधील अनेक शाळांनी या स्पिनर्सवर चक्क बंदी घातली आहे. अशी बंदी आमच्याकडे घातली असती तर ‘विद्यार्थ्यांनी काय खेळावं हेही आता शाळा ठरवणार का?’ इथ पासून ‘हे संघी षडयंत्र आहे’ इतपर्यंत काय वाट्टेल  त्या चर्चा आमच्या वृत्तवाहिन्यांनी रंगवल्या असत्या. रस्त्यातून चालताना मोबाईलचा वापर केल्याने अपघात होणे ही गोष्ट आपल्याकडे तरी नवीन नाही. त्यात आता या स्पिनर्सचीही भर पडणार आहे इतकंच. मुळातच गतिमान असलेल्या स्पिनर्स मुळे हे मनाला स्थैर्य मिळणं अशक्यच, मग ताणतणाव (स्ट्रेस) कमी होणं ही त्याहून अशक्य गोष्ट. किंबहुना ते फिरवत राहण्याचं त्याचंच व्यसन लागण्याची शक्यता अधिक. जगभरातल्या अनेक नामवंत मानसोपचार तज्ज्ञांनी हेच मत नोंदवलं आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी म्हणून हे स्पिनर्स वापरायचे असतील तर आगीतून फुफाट्यात अशीच स्थिती होईल. त्यातून या खेळण्याच्या खोक्यांवर बहुतेक वेळा Made in China हे शब्द दिसतील. आपल्याकडचा माल खपवण्यासाठी त्याला आरोग्याची जोड देण्याची ही चीनी मार्केटिंग ड्रॅगनची नवी खेळी आहे; तिला बळी पडू नका. अगदीच टाईमपास हवा म्हणून क्वचित कधीतरी खेळणं म्हणून fidget spinner चा वापर करायला हरकत नाही. मात्र ते खरेदी करत असताना Made in China नाहीत ना याची आवर्जून खात्री करा.

शरीरातली रग जिरवायला पूर्वी मैदानी खेळ, घरातली कामे, आणि चालण्यावर असणारा भर ही व अशी अनेक औषधे होती. नंतर त्याची जागा इडीयट बॉक्सने आणि आता मोबाइलने घेतली आहे. आता कार्टून व मोबाईल गेम हे घराघरात रुळल्याने याने मुलांच्या अंगातली रग जिरण्याऐवजी सडून जाते हे अनेकांच्या वेळेत लक्षात आलं नाही. यातले धोके हळू हळू समजायला लागल्याने आई-वडिलांनी पुन्हा मुलांना शारिरिक हालचालींकडे वळवताना या असल्या थेरांत गुंतू नये हे उत्तम.

पारंपारिक वास्तूशास्त्राची अंधश्रद्धा अशी संभावना करुन अमुक कोपर्‍यात कासव आणि तमुक कोपर्‍यात हिडीस हसणारा कुरूप जाडा म्हातारा ठेवला तर घरात समृद्धी येईल अशा भूलथापांना बळी पडून आपण फेंगशुई जवळ केली, तसंच आता हे छद्मवैज्ञानिक (pseudo-scientific) फॅड रुजू पाहत आहे. त्याला थारा देता कामा नये.

या चायनीज उत्पादनापेक्षा आपली देशी १०८ मणी/ रुद्राक्षांची माळ कधीही स्वस्त आणि मस्त. फारच ताणतणाव जाणवत असेल तर माळ घेऊन रामनाम जपा! जप कसा करावा याबद्दल लेखात वर लिहीलंच आहे.
बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं। शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥
विचारें बरें अंतरा बोधवीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥
जय जय रघुवीर समर्थ ॥

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ शु. १३, शके १९३९

संदर्भः
(१) आनंद राजाध्यक्ष
(२) वैद्य परीक्षित शेवडे

सलाम

(मंगेश पाडगावकरांची माफी न मागता )

सलाम

सबको सलाम
ज्याच्या हातात चॅनल त्याला सलाम,
पगाराच्या भयाने
डाव्या हातात माईकचं बोंडुक घेऊन
उजव्या हाताने सलाम,
बघणाऱ्याला सलाम,
न बघणाऱ्याला सलाम,
विकत घेणाऱ्याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला लाल सलाम,
सलाम, भाई, सबको सलाम.

चादर घातलेल्या प्रत्येल थडग्याला सलाम,
डिवायडर पीराला सलाम
देवळांना फोडून बांधलेल्या मशिदींना सलाम,
मशादीतल्या मौलवींच्याच्या धाकाला सलाम,
मशिदीतून, लाउडस्पीकरवरुन
बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्याला सलाम,
परवरदिगार आणि त्याच्या मजहबचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम,
रिकाम्या गर्भाशयात जीव भरण्यासाठी
निष्पाप मोहतरमाला नासवणाऱ्या बंगालीबाबाला  सलाम
चाँदला सलाम
बकऱ्याला सलाम,
दहशतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
अम्मीच्या उरावर दुसरी अम्मी बसवणाऱ्या अब्बाला सलाम,
दुसऱ्या अम्मीला टरकावणाऱ्या तिसऱ्या अम्मीला सलाम,
सलाम, प्यारे भाईयों और बेहेनों,
सबको सलाम.

ज्याच्या हातात कोयता
त्याला सलाम,
ज्याच्या गळ्यात क्रूस
त्यालाही सलाम,
चर्चच्या पादऱ्यांना सलाम,
त्यांची वेसण धरणाऱ्या
व्हॅटिकनला सलाम,
ज्याच्या सेवेला नन त्याला सलाम,
तिला भोगणाऱ्या फादरला सलाम
तिचा गर्भपात करतो
त्यालाही सलाम
क्रिसमस आणि व्हॅलेन्टाइनच्या गर्दीला सलाम,
ती गर्दी झुलवणाऱ्या
जादूगारांना लाल सलाम,
भाईयों और बेहेनों सबको सलाम.
नाक्यावरच्या अनधिकृत चिकनशॉपला सलाम
शेजारच्या इल्लीगल गॅरेजला सलाम
ते चालवत वखवखलेल्या नजरेने सावज शोधणार्‍या वाहिदला सलाम
सोनं म्हणून आरडीएक्स स्मगल करणार्‍याला सलाम
ते वापरून बनवलेले बाँब ठेवणार्‍यांना सलाम
स्फोट झाल्यावर जिहादी जल्लोष करणार्‍यांना सलाम
त्यांना पकडू पाहणार्‍या पोलीसांना सलाम
त्यांचे ट्रक न तपासता जाऊ देणार्‍यांनाही सलाम
टायगर मेमनला सलाम,
त्याला श्रद्धांजली वाहणार्‍या
कुबेरांनाही सलाम,
लोकसत्तालाबी सलाम,
सकाळलाही सलाम,
काँग्रेसला बुडवणार्‍या राहुल गांधींना सलाम,
गांधींखाली चिरडलेल्या
प्रणवदांना, नरसिंह रावांना सलाम,
ज्याच्या हातात विळा हातोडा त्याला सलाम,
सैनिकांना बलात्कारी म्हणणार्‍यांना सलाम,
भारत तेरे टुकडे होंगे म्हणणार्‍यांना,
कन्हैया कुमारला सलाम,
कविता कृष्णनला सलाम;
आनंद पटवर्धननांना सलाम,
कबीर कला मंचला सलाम,
निरपराध मुलांना बायकांना मारणार्‍या नक्षलवाद्यांना सलाम,
मौत सस्ती करणाऱ्या सर्वांना लाल सलाम,
सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम.

फिल्म इन्स्टिट्युटला सलाम
त्यातल्या मध्यमवयीन विद्यार्थ्यांना सलाम,
काहीही त्रास नसलेल्यांना सलाम
पण सतत तुम्हाला कसलातरी त्रास आहे असं
पटवणार्‍या कॉम्रेडांना सलाम
गोळी घालणार्‍यांना सलाम
ती घालण्याच्या आदेश देणार्‍यांना सलाम
कॅपिटालिस्ट मालकांना सलाम
कम्युनिस्ट कामगार नेत्यांना सलाम
दिवाळी बोनसला सलाम
संपाला सलाम
उपासमारीला सलाम
युनियनच्या लिडरला सलाम,
संपात बरबाद झालेल्या कामगाराला सलाम
त्याच्या पिचलेल्या बायकोला सलाम
दीड खोलीत अभ्यास करणार्‍या
एकच गणवेश आठवडाभर वापरणार्‍या
त्यांच्या पोरांना सलाम
चीनला सलाम
सोवियत रशियाला सलाम
लाल झेंड्याला सलाम
सलाम, लाल सलाम
सलाम, भाईयों और बेहेनों, सबको सलाम.
या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
याच देशात राहून त्याचे टुकडे करण्याच्या घोषणा देणार्‍यांना सलाम
गायीचं मांस खाणार्‍यांना सलाम
तिला रस्त्यावर कापणार्‍यांना सलाम
आमचा धर्म शांततेचा या सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
हिंदूद्वेष्ट्या उकिरड्यांना सलाम,
या उकिउरडयांतून मजहबचं पीक काढणाऱ्यांना सलाम,
टोपी आणि बुरख्याला सलाम,
पंक्चरवाल्या मियाँला सलाम,
त्यांच्या शेकडो लौढ्यांना सलाम,
निवडणुकांना सलाम,
निवडणुक प्रचाराला सलाम,
निवडणुकांवर डोळा ठेऊन झालेल्या
निरनिराळ्या वांझोट्या आंदोलनांना ,
विद्यार्थी चळवळीला सलाम
नॉट इन माय नेमला सलाम
आद्य चळवळ बामण हटावला सलाम
लाल झेंडा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम,
या सर्व अत्याचार करणाऱ्यांना सलाम,
या बातम्या वाचणाऱ्या सर्व षंढांना लाल सलाम,
सलाम, भाईयों और भैनों, सबको सलाम.

वरपासून खालपर्यंत आरक्षणाचा देश म्हटले
तर डोके फोडतील ,
भत्ताखाऊ फुकट्यांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणाऱ्या पत्रकारांचा देश म्हटले
तर मोर्चे काढतील,
दगडाला देव आणि गायीला माता म्हटलं
तर हिंदू दहशतवादी म्हणून दम देतील
मोर्चात जातो म्हटले
तर नोकरीवरून काढतील;
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझ्या
शेख्युलर हिरव्या देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
लाल सलाम
प्यारे भाईयों और बेहेनों, सबको सलाम,

अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ़ करना भाईयों,
हात तर दोनच
आणि त्यातला उजवा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त
डाव्या हाताने सलाम,
सलाम, सबको लाल सलाम
भाईयों और बेहेनों, सबको सलाम.

© मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ८, शके १९३९

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि विरोधकांची चिडचिड

सतत तुम्ही हजारो वर्षांपासून गुलाम आहात असं एखाद्या किंवा जमल्यास अनेक समाजांच्या मनावर पिढ्यानपिढ्या बिंबवणे, आणि मग तदनुषंगाने तुम्ही त्या तथाकथित गुलामीतून बाहेर आलं पाहीजे असं पटवून देत राहणे, आणि मग त्या तथाकथित गुलामीतून बाहेर येण्यासाठी सातत्याने एक काल्पनिक शत्रू उभा करुन उदा. एखाद्या समाजाला लक्ष्य करुन – आधी वैचारिक आणि मग सामरिक बंडासाठी प्रवृत्त करणे हा डाव्या/साम्यवादी/नक्षलवादी मानसिकतेच्या लोकांचा प्रयत्न असतो. मग ज्या समाजाला गुलाम म्हणायचं तो समाज किंवा व्यक्ती किती कौशल्यविकसित, उच्चशिक्षित, आणि समृद्धीच्या दिशेने अग्रेसर असलेली का असेना !

काल राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एन.डी.ए.) चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवाराच्या नावाची घोषणा होताच ज्या प्रकारे विरोधी पक्ष, डाव्या/साम्यवादी/नक्षलवादी आणि त्यांचे समर्थक, आणि विकला गेलेला मिडिया आणि त्यांचे सोशल मिडीयावर पडीक असणारे तट्टू यांची निराशा आणि त्यापासून उत्पन्न झालेली तडफड दिसते आहे ती या भीतीपोटी की आता जगाला संघ काय चीज आहे ते समजेल. आता ही गोष्ट समजणे काही रॉकेट सायन्स नव्हे की भाजपला सर्वसहमतीसाठी एका दलित उमेदवाराची गरज होती, तसेच तो उमेदवार उच्चशिक्षित, राजकारणाचा अनुभव असलेला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संघाच्या विचारसरणीचा हवा होता.

श्री रामनाथ कोविंदजी या सगळ्या निकषात अगदी व्यवस्थित बसतात. ते दलित तर आहेतच, शिवाय ते एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात ते १६ वर्ष वकील होते, आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण आहेत, काही शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनात ते होते, आणि संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा व संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेपुढे भाषण करण्याचाही त्यांना अनुभव आहे. संघातून आल्यामुळे त्यांना सामाजिक कार्याची आवड आणि अनुभव आहे हे वेगळं सांगायला नकोच. शिवाय सद्ध्या ते काही वर्ष बिहारचे राज्यपाल आहेत. चाराखाऊ लालूंचे चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी शपथ घेताना “अपेक्षित” ऐवजी “उपेक्षित” असा उच्चार केल्यामुळे ज्यांनी सगळी शपथ परत घ्यायला लावली होती, ते हेच श्री रामनाथ कोविंद.

उपरोक्त विरोधकांना ही गोष्ट मात्र केल्या पचत नाही आहे की अशी व्यक्ती एक संघी आहे. संघी या शब्द मुद्दामून वापरला आहे कारण आजकाल  संघाच्या अंधविरोधकांचा हा आवडता शब्द आहे. आता ही गोष्ट संघाच्या समर्थकांनाच नव्हे तर विरोधकांनाही ठावूक आहे की संघात कुणी कुणाला जात विचारत नाही, आणि एकत्र संघ शाखेत जाणार्‍यांमधे जातीला काहीच महत्व दिलं जात नाही. इतकंच नव्हे तर अनेक विजातीय संघ कार्यकर्त्यांमधे आपापसात निव्वळ रोटीच नव्हे तर बेटी व्यवहार देखील आहेत.

हे माहीत असून काही अंशी अज्ञानापोटी आणि बहुतांशी हेतूपुरस्सर संघाची सातत्याने ब्राह्मणांची आणि उच्चवर्णीयांची संघटना अशी प्रतिमा तयार करण्यात आणि संघकार्याशी अपरिचित जनमानसावर बिंबवण्यात आजवर या अंधविरोधकांनी कुठलीच कसर बाकी ठेवली नव्हती. या दुष्प्रचाराला पहिला धक्का बसला कुठल्याही तथाकथित उच्च जातीशी संबंध नसलेले श्री नरेन्द्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा. पण मोदींना विरोध करायला त्यांच्याकडे अन्य मुद्दे होते. त्यांच्या दुर्दैवाने श्री रामनाथ कोविंदांच्या बाबतीत त्यांना असं काहीच करता येत नाही.

विरोधकांचं खरं दु:ख हे आहे की राष्ट्रपतीपदाचा या वेळचा उमेदवार हा दलित, उच्चशिक्षित, अनुभवी, आणि संघी असे सगळे असल्याकारणाने संघ आणि भाजपच्या चारित्रहननाकरता त्यांना जात हा मुद्दा उकरून काढता येणार नाही. मिडियाची जी तडफड सगळीकडे बघायला मिळते आहे ती या कारणाने की आता संघ आणि भाजप हे दलितविरोधी ही प्रतिमा निर्माण करताना ज्या खोट्या बुद्धीभेदी कथांचा पूर आणला जायचा तो आणण्यात ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. आता ही गोष्ट जगासमोर वारंवार येणार की भारतवर्षाचा राष्ट्रपती हा दलित तर आहेच पण तो संघी सुद्धा आहे. अर्थात, ही गोष्ट अखिल विश्वापुढे उघड होईल की संघ जातीयवादी तर नाहीच, पण या उलट संघ प्रत्येक जातीला राजकारणात उच्च स्थान मिळवून देशसेवा करण्यासाठी समान संधी उपलब्ध करुन देतो.

मिडियामधे जी तडफड दिसते आहे त्याने प्रत्येक राष्ट्रवादी भारतीयाला गुदगुल्या नक्की होत असणार. मलाही होत आहेत यात आश्चर्य ते काय?! लोग मजा बघत आहेत, तुम्हीही बघा.

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

।। भारत माता की जय ।।

|| वंदे मातरम् ||

© मंदार दिलीप जोशी

जेष्ठ कृ. १०, शके १९३९ | योगिनी एकादशी

राष्ट्रपतीपद का चुनाव एवं विरोधियों की तिलमिलाहट

ज्ञान न पूछो वामी का, पूछ लीजिये जात।
दलित क्यों नहीं पॉलिटब्यूरो में, पूछो मार के लात !

हमेशा आपको आप हजारों सालों से गुलाम (दास) हैं यह कुछ समाजोंघटकों के  मन पर पीढी दर पीढी बिंबित करते रहना, फिर उस संदर्भ में आपको इस तथाकथित दास्यत्व से बाहर आना आवश्यक है यह बार बार समझाना, एवं उस पश्चात आपको इस तथाकथित दास्यत्व से बाहर निकालने हेतू सातत्यपूर्ण ढंग से एक काल्पनिक शत्रू को आपके सामने खडा करना, उदाहरण किसी एक समाज को लक्ष्य करके – प्रथमत: वैचारिक और उस पश्चात सामरिक विद्रोह के लिये आपको प्रवृत्त करना यह वामपंथी/साम्यवादी/नक्षलवादी मानसिकता के लोगों का प्रयत्न रहा है. फिर जिन्हें ये गुलाम बतलाने इच्छुक हैं वो समाज अथवा व्यक्ती कितना भी कौशल्यविकसित, उच्चशिक्षाप्राप्त, एवं समृद्धी की ओर अग्रेसर क्यों न हो!

कल राष्ट्रीय लोकतंत्र मोर्चा (एन.डी.ए.) के राष्ट्रपतीपद के प्रत्याशी के नाम की घोषणा होते ही जो विरोधक, वामपंथी/साम्यवादी/नक्षलवादी एवं उनके समर्थक, तथा बिकाऊ मिडीया एवं उनके सोशल मिडीया पर पडे खच्चरों की निराशा से उत्पन्न बैचैनी और विषवमन दृग्गोचर हो रहा है वह इस बात पर है की अब सारे दुनिया को पता चल जाएगा कि संघ है क्या. यह बात कोई रोकॅट साईन्स तो नहीं थी कि भारतीय जनता पक्ष सर्वसहमती के हेतू एक दलित, उच्चशिक्षित, राजनीतीका अनुभवी, एवं संघ की विचारधारा रखने वाला कोई प्रत्याशी की खोज कर रही थी.

श्री रामनाथ कोविंदजी इन सारे निकषों में खरे उतरते हैं. वे दलित हैं, इतना ही नहीं वे गरीब किसान कुटुंब से आते हैं, दिल्ली उच्च न्यायालय एवं सर्वोच्च न्यायालय में वे १६ वर्ष वकील थे, आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण हैं, कुछ शैक्षणीक संस्थाओं के व्यवस्थापक भी रहें हैं, केवल इतना ही नहीं उन्हे संयुक्त राष्ट्रसंघ में भारत का प्रतिनिधित्व करने का एवं  संयुक्त राष्ट्रसंघके आमसभा को संबोधित करनेका भी अनुभव प्राप्त है. संघी है तो पृथक बताना आवश्यक नहीं कि उन्हें सामाजिक कार्य में रुचि है अपितु अनुभव भी प्राप्त है. अब कुछ वर्षों से वे बिहार के राज्यपाल हैं. हां, यह वहीं है, जिन्होनें “अपेक्षित” के स्थान पर “उपेक्षित” कहने पर तेजस्वी यादव को पूरी शपथ पुन: पढने का आदेश दिया था.

परंतु उपरोक्त विरोधकों को यह बात पच नहीं रही की ऐसा व्यक्ती एक संघी है. हेतूपूर्वक इस शब्द का प्रयोग किया है क्योंकी बिकाऊ पत्रकारों को और संघ के अंधविरोधकों को इस शब्द का उपयोग करने के अभ्यस्त हैं. ये संघ के समर्थक ही नहीं अपितु संघ विरोधकों को भी ज्ञात है कि संघ मे किसी की जाति पूछी तक नहीं जाती, एवं नहीं साथ साथ संघ शाखा में जाने वाले लोगों मे जाती कोई महत्व नहीं रखती. इतना ही नहीं अनेक विजातीय संघ कार्यकर्ताओं के आपस में केवल रोटी ही नही बेटी व्यवहार भी हैं.

आज तक संघ को सातत्य से ब्राह्मणो एवं उच्च जातीयों के संगठन  के रूप में संघकार्य से अपरिचित जनमानस के मन पर बिंबित करने में इन अंधविरोधकों नें कोई कसर नहीं छोडी थी. इसको पहली चोंट तब पहुंची जब श्री नरेन्द्र मोदी जो किसी तथाकथित उच्च जाती से संबंध नहीं रखते वे प्रधानमंत्री बने. परंतु उनका विरोध करने के हेतू विरोधकों के पास अन्य विषय थे.  श्री रामनाथ कोविंदजी के विषय में ऐसा कुछ भी नहीं है.

विरोधीयों का दु:ख यह है कि इस बार राष्ट्रपतीपद के प्रत्याशी के दलित एवं संघी होने के कारण अब संघ एवं भारतीय जनता पक्ष के चारित्र्यहनन के लिये उनको जाती का आधार कैसे मिलेगा? मिडीयाकी जो तिलमिलाहट दृग्गोचर हो रही है, वह इस हेतू है की सालों पुराने संघ एवं भाजपा के दलितविरोधी होने की कहानियों की बाढ लाने मे वे इस बार पूरी तरह से असफल रहे हैं. अब यह बात विश्व के सामने बार बार आयेगी की भारतवर्ष का राष्ट्रपती दलित है एवं संघी भी है. अर्थात, यह बात विश्व को दृग्गोचर होगी की संघ जातीवादी तो है ही नही, अपितु संघ हर जाती के लोगों को राजनीती में उच्च स्थान प्राप्त कर देशसेवा करने हेतु समान अवसर प्राप्त कराता है.

मिडिया की इस छटपटाहट से हर राष्ट्रवादी भारतीय को गुदगुदी तो अवश्य हो रही है. मुझे भी होना आश्चर्य की बात नहीं. आप भी मजे लिजीये.

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

।। भारत माता की जय ।।

|| वंदे मातरम् ||

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. १०, शके १९३९ | योगिनी एकादशी

बालादपि सुभाषितम् ग्राह्यं आणि हाताला लागेल ते हत्यार

विषादप्यमृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम् ।
अमित्रादपि सद्वृत्तममेध्यादपि काञ्चनम् ॥

या श्लोकातील बालादपि सुभाषितम् ग्राह्यं हा भाग महत्त्वाचा आहे. याचा ढोबळ अर्थ लहान मुलांकडूनही अनेकदा आपल्याला काहीतरी महत्त्वाचं शिकता येतं. शाळा सुरू होण्याचे हे दिवस आहेत. आजच मुलांच्या पालकसभेला जाऊन आलो आणि शाळेत बाईंनी मुलांची आगाऊच केलेली एक तक्रार ऐकून डोक्यात लख्ख प्रकाश पडला. शाळेत मुलं मारामार्‍या करतात अशी ती तक्रार होती. वर्ष सुरू होत आहे, तेव्हा तुमच्या मुलांना आत्ताच समजावून सांगा असं त्यांचं म्हणणं होतं. इतर सूचनांमधे स्टीलची पट्टी मुलांना शाळेत देऊ नका, लाकडी द्या, कारण, मारामारी करताना मुलं अक्षरशः हाताला लागेल ती वस्तू फेकून मारतात. त्यात निरुपद्रवी खोडरबरा पासून टोकदार पेन्सिली, तीर्थरूपांची हळूच ढापलेली पेनं, पट्टी, प्लॅस्टीक आणि स्टीलचे जेवणाचे डब्बे या सगळ्या वस्तू आल्या. आता आजकालची मुलं अधिक आक्रमक किंवा हिंसक होत आहेत हा मुद्दा जरा बाजूला ठेवूया. पण आपणही कधीतरी त्यांच्या वयाचे होतोच. समोरच्या मुलाने आपल्याला मारल्यावर हाताला लागेल ती वस्तू फेकून मारण्याची लहान मुलांकडे किंवा लहानपणी असलेली कल्पकता मोठेपणी कुठे जाते? मोठं झाल्यावर आपला मेंदू इतका गोठल्यासारखा का होतो? मी हे काय बोलतो आहे कळत नाही आहे ना? सांगतो. Continue reading बालादपि सुभाषितम् ग्राह्यं आणि हाताला लागेल ते हत्यार